नागपुरात गोळी झाडून तरुणाची हत्या, दोघे जखमी तर तीन आरोपींना अटक
नागपूर: मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनीतील प्रकाशनगर परिसरात भर भाजी बाजारात चौघांनी शिवीगाळ करीत गोळीबार केला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक ग्राहक जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता व पोलिसांना बंदोबस्त तैनात करावा लागला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सोहेल असे मृताचे नाव आहे. प्रकाशनगर येथील गोविंद लॉनजवळ ही घटना घडली. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास बाजारात चार आरोपी गाडीने आले व त्यांनी तेथील ठेल्यांजवळ गाडी थांबविली. तेथील तरुणांना शाहरूख कुठे आहे असे विचारत आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. एकाने देशी पिस्तूल काढत गोळीबारच सुरू केला. त्यातील एक गोळी लागून सोहेल खान (३५) नावाचा तरुण जखमी झाला. तर भाजी विकत घेण्यासाठी आलेल्या मो. सुलतान उर्फ मो. शफी याच्या मानेला चाटून गोळी गेली व तोदेखील जखमी झाला. घटनास्थळावर एक जिवंत काडतूसदेखील आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली व पळापळ झाली. मानकापूर पोलिस ठाण्याच्या पथकाला याची माहिती देण्यात आली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले व सोहेलला मेयो इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. धीरज घोडमारे, राजेंद्र मरकाम व भूषण अशी आरोपींची नावे आहेत. तर चौथा आरोपी चंदू डोंगरे हा फरार आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी पोहोचले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळावरील तणाव शांत करण्याचा प्रयत्न करत होते.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. काही संतप्त तरुणांनी घोषणाबाजी करत काही दुचाकींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. भाजीचा ठेला लावण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मेयो इस्पितळासमोर देखील लोक जमले होते व तेथेदेखील तणाव निर्माण झाला होता. तेथे तहसील पोलिस ठाण्यातील पथकाचा बंदोबस्त लावण्यात आला होता
सम्राट अशोक राजाच्या शिलालेखांचे गाढे अभ्यासक
अशोक तपासे यांना फ्रॅंकफोर्ड युनिव्हर्सिटीकरून डॉक्टरेट प्रदान !
लेणीसंवर्धन चळवळीकडून अशोक तपासे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
मुंबई दि. ०४ मार्च, २०२५ :
देशभरातील सम्राट अशोक राजांच्या शिलालेखांचा गाढे अभ्यासक आणि शिलालेखांचे प्रत्यक्षात जागेवर जाऊन वाचन करणारे अशोक तपासे यांना फ्रॅंकफोर्ड युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. शिलालेखांच्या अच्युत कामगिरीची पोचपावती म्हणून त्यांना ही डॉक्टरेट देण्यात आली आहे. त्यामुळे लेणी संवर्धन चळवळीकडून तपासे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
मुंबई:-
अशोक तपासे यांनी २००९पासून पालि भाषेचे अभ्यासक आहेत. त्याचा शिलालेखांचा अभ्यास सुद्धा आहे. ब्राह्मी लिपी शिकून त्यांनी भारतभर भ्रमण केले. जेथे जेथे सम्राटांचे शिलालेख आहेत. त्या स्थळांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. कालसी (उत्तराखंड ) ते ब्रह्मगिरी (कर्नाटक ) आणि जुनागड (गुजरात ) ते जोऊँगडा (ओरिसा)पर्यंत त्यांनी ३५ शिलालेखांचे वाचन केले. वेगवेगळ्या स्थळांवरील शिलालेखातील मजकूर व त्याच्या आशयाबाबत त्यांना फरक जाणवला व तो त्यांनी शोध निबंधातून मांडला आहे.
२०१४ मध्ये शिलालेखावर पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये त्याची हिंदी आवृत्ती आली. त्याच वर्षी त्यांनी श्री श्री विद्यापीठ येथे शोधनिबंध सादर करून बुद्ध यांचे महापरिनिर्वाण इ. स. पूर्व ५१६ मध्ये झाले असल्याचे शिलालेखावरून स्पष्ट होते असल्याचा पुरावा अधोरेखित केला. या शोध निबंधाचे हिंदी भाषांतर करून त्यांनी जबलपूर व तेलंगणा येथील सोशल सायन्स अँड मॅनेजमेंट स्टडीज आणि एपीग्राफिकल सोसायटी ऑफ इंडिया यांना सादर केले. म्हणूनच फ्रॅंकफोर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टरेट प्रदान करून त्यांचा गौरव केला आहे.
सध्या ते भारतीय बौद्ध कालमापनावर संशोधन करीत असून स्वतंत्र बौद्ध कालमापन पद्धती कशी अवलंबिता येईल याचा अभ्यास करीत आहेत. अशोक तपासे हे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदविका धारक आहेत. समता नगर येथील टेलिफोन कार्यालयातून निवृत्त झाल्यावर शिलालेखांच्या प्रांगणात त्यांनी भरारी कामगिरी केली आहे.
------------------------------------------------
गोसिखुर्द धरणाचे पाणी सोडण्यासह इतर मागन्यांना घेऊन 5 एप्रिल रोजी काँग्रेसचे वैनगंगा नदीपात्रात ठिया आंदोलन - मोठ्या संख्येने शेतकऱ्यांसाह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन
गडचिरोली:: गोसीखुर्द धरणातील पाणी तातडीने सोडण्यात यावे, गडचिरोली येते होणाऱ्या विमानतळाकरीता सुपीक जमिन अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा, भेंडाळा त.चामोर्शी परीसरातील MIDC करिता प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र स्थापना करण्याकरिता शासनाने अवलंबिलेले धोरण शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे असून शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय जागा अधिग्रहीत करू नये, कोटगल बँरेज करिता अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मोबदला संबधित शेतकऱ्यांना मिळाला नसून, योग्य तो मोबदला त्वरित देण्यात यावा व जे शेती बारमाही पाण्याखाली बुडीत क्षेत्रात येते अश्या शेतीस अतिरिक्त मोबदला देण्यात यावा, मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे थकीत असलेले मजुरीचे पैसे त्वरित देण्यात यावे, वडसा - गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनधारक सर्व शेतकऱ्यांना नवीन दरानुसार जमिनीचा मोबदला देण्यात यावा यासह जिल्ह्यातील इतर मागण्यांना घेऊन, दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी, दुपारी 1.00 वाजता, गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने , चंद्रपूर रोड वरील वैनगंगा नदी पात्रात , पुलीयाच्या खाली ठीय्या आंदोलन करण्यात येणार असून मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, जिल्ह्यातील शेतकरी, नदी काठावरील गावाकऱ्यांनी आंदोलनास उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.
आंदोलन दिनांक - 05 एप्रिल 2025
वेळ - दुपारी 1.00 वाजता
ठिकाण- वैनगंगा नदी पुलिया खाली ( चंद्रपूर रोड )
नौकरी लाउन देतो म्हणून तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले व बंदुकीचा धाक दाखवून केला बलात्कार
डोंबिवली :-
डोंबिवलीतून एक अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे, जिथे एका ठगाने एका मुलीला फसवले, तिला फोन करून बोलावून बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. मात्र, मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि तपासही सुरू केला आहे. रीलबाज सुरेंद्र पाटील आणि त्यांच्या ड्रायव्हरविरुद्ध मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण डोंबिवली येथील आहे, जिथे एका १९ वर्षीय मुलीने डोंबिवलीजवळील ठाकुर्ली येथील रीलबाज सुरेंद्र पाटील यांच्याविरुद्ध मानपाडा पोलिस ठाण्यात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ आरोपी पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, ही घटना १६ फेब्रुवारी ते २९ मार्च दरम्यान डोंबिवली पूर्वेतील दावडी परिसरात घडली
नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन
सुरेंद्र पाटील यांची इन्स्टाग्रामवरून मुलीशी मैत्री झाली होती, त्यानंतर त्यांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली. त्यानंतर आरोपीने मुलीला विमानतळावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले, या संदर्भात त्याने तिला डोंबिवलीला बोलावले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. मुलीने तिच्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की जेव्हा तिने त्याला असे करण्यास विरोध केला तेव्हा त्याने तिला बंदूक दाखवली आणि तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.
एस .टी. बस ही गरीब आणि मध्यमवर्गीयांची जीवनदायिनी -आमदार सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर जिल्ह्यासाठी 10 नवीन बसेस मंजूर, पहिल्या टप्प्यात 5 बसेसचे लोकार्पण
चंद्रपूर, दि. 3: चंद्रपूर जिल्ह्यासाठी दहा नवीन बसेस मंजूर करण्यात आल्या असून, एसटी महामंडळाच्या सेवेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या नव्या बसेस केवळ वाहने नसून, जनतेच्या विश्वासाचं, संवादाचं आणि सेवाभावाचं प्रतीक आहेत. प्रत्येकाचा प्रवास अधिक सोयीचा, सुरक्षित आणि सुसज्ज व्हावा, जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. चंद्रपूर हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील जिल्ह्यांपैकी एक असून, एसटी ही गरीब आणि मध्यमवर्गीयांची जीवनदायिनी असल्याचे मत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर बसस्थानक येथे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागातर्फे मंजूर झालेल्या दहा नव्या बसेसपैकी पहिल्या टप्प्यातील 5 बसेसला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चंद्रपूरच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, विभागीय वाहतूक अधिकारी पुरुषोत्तम व्यवहारे, आगार व्यवस्थापक अंकुश खाडिलकर, विभागीय अभियंता (स्थापत्य) ऋषिकेश होले, बसस्थानक प्रमुख हेमंत गोवर्धन, कार्यशाळा अधीक्षक मनोज डोंगरकर, वाहतूक निरीक्षक अंकित कामतवार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रकाश तोडकर, बंडू गौरकार आदी उपस्थित होते.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी अर्थमंत्री असताना एसटी महामंडळाला सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला होता. याचे कारण म्हणजे श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या वाहनाने प्रवास करू शकतो, परंतु गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी एसटी हा प्रवासाचा आधार आहे. सर्वांच्या सुखदुःखामध्ये एसटी महामंडळाने साथ दिली आहे. चंद्रपूर, बल्लारपूर आणि मुल या बस स्थानकांसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या बसस्थानकांच्या नूतनीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. परिवहन मंत्र्यांनी निधी न मागता देखील 700 नवीन बस खरेदीसाठी निधी दिला. त्याचबरोबर ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मुंबईतील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी 'तेजस्विनी' वातानुकूलित बसेस उपलब्ध करून दिल्यात.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी 200 नवीन बसेस मंजूर करण्यात आल्या होत्या, त्यापैकी 100 बसेस जिल्ह्याला मिळाल्या असून उर्वरित 100 बसेस लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे चंद्रपूर जिल्ह्याला भेट देणार असून, येथील वाहन चालकांची पदे, त्यांच्या निवास व्यवस्थेबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल. मुल येथे बस डेपो उभारण्यासाठी जागा निश्चित झाली असून, त्याच्या उभारणीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यासंबंधी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लवकरच चंद्रपूर दौऱ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचेही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. एसटी महामंडळाची सेवा अधिक सक्षम व कार्यक्षम होईल आणि प्रवाशांना उत्तम सुविधा मिळतील, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बस स्थानकातील विविध स्टॉलला भेटी दिल्या व शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शेतशिवारात विज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
तुमसर:-
तुमसर तालुक्यातील पाथरी येथे आज दि. 3 एप्रिल ला दुपारी 12 वाजताच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अंगावर वीज कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मनीषा भारत पुष्पतोडे वय 27 वर्षे आणि प्रमोद मनीलाल नागपुरे वय 45 वर्षे असे या दोन मृतक शेतकऱ्यांची नावे असून दोघेही रा. पाथरी येथील रहिवासी आहेत. सध्या परिसरात शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकांची लागवड केली असून शेतात काम करण्यासाठी गेलेले होते आज अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट सुरू झाला पाहता - पाहता शेतीचे काम करत असताना दोघांच्या अंगावर वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने मात्र गावात शोककळा पसरली आहेव हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
लक्ष्मणपूर येथे एका इसमाने केली गळफास घेऊन आत्महत्या
आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील लक्ष्मणपूर येथे एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि ३ एप्रिल ला सकाळी उघडकीस आली आहे
मृतकाचे नाव रमेश गजानन चनेकार वय ५२ वर्षे रा.लक्ष्मणपूर असे असून ते काल दि २ एप्रिल चे रात्री ११.३० ते पहाटे ५.०० वाजताच्या दरम्यान घराच्या बाजूला असलेल्या टिनाच्या मांडवाच्या फाट्याला दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे
सकाळी जेव्हा घरातील कुटुंब जागे झाले तेव्हा ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले तेव्हा सुधीर बंडू चनेकार वय २९ वर्ष रा.लक्ष्मणपूर यांनी आष्टी पोलीस स्टेशन ला माहीती दिली त्यावरुन पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे
त्याने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा भाऊराव वनकर करीत आहेत
राजेश श्रीधर पिंपळशेंडे नवोदय करीता पात्र
आष्टी:-
लिटील हार्ट इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी ता .चामोर्शी जिल्हा गडचिरोली या शाळेतील राजेश श्रीधर पिंपळशेंडे रा.आष्टी यांची नवोदय विद्यालय घोट येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे
नवोदय विद्यालय घोट येथे शिक्षण घेण्यासाठी फार मोठी चढाओढ असते म्हणून त्या शाळेत फक्त हुशार विद्यार्थी घेतले जातात त्याकरीता नुकतीच गडचिरोली जिल्ह्यात पाचव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती त्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यात राजेश श्रीधर पिंपळशेंडे हा उतिर्ण झालेला आहे
त्याने आपल्या यशाचे श्रेय आई - वडील शाळेचे मुख्याध्यापक कृष्णमूर्ती,शिक्षकवृंद यांना दिले आहे
खाणीत होणाऱ्या स्फोटांमुळे घराला तळा गेल्यात व शेतीही झाली नष्ट आता भटाळी गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला मिळणार गती
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार
पुनर्वसन प्रक्रियेसाठी आवश्यक पावले उचलण्यास कटिबद्ध
भटाळी गावाच्या पुनर्वसनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा
चंद्रपूर, दि. 2: भटाळी ओपन कास्ट माइन्समुळे भटाळी गावाला गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी घटल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खाणीत होणाऱ्या स्फोटांमुळे घरांना तडे गेले आहेत, तर शेती नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासोबत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी भटाळी गावात पाहणी दौरा केला. गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्याचा निर्धार केला असून, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
भटाळी गावाच्या पुनर्वसनासंदर्भात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या समवेत पाहणी दौरा बुधवार (दि.02)केला. यावेळी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन)अतुल जटाळे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, पायली भटाळीचे सरपंच किसन उपरे, उपसरपंच विकास पेदांम, रामपाल सिंग, अनिता भोयर, सुरज पेदुलवार, राकेश गौरकार तसेच वेकोलीचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, गाव पुनर्वसन समिती भटाळीच्या वतीने गावाच्या पुनर्वसनाबाबत नुकतीच बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीत पुनर्वसनाला होणारा उशीर लक्षात घेता, डब्लूसीएलकडून कोळसा उत्खनन सुरू असतानाच गावाला धोका निर्माण होत असल्याने पुनर्वसन तातडीने व्हावे, अशी मागणी भटाळीवासीयांकडून करण्यात आली. यासाठी आमदार श्री. मुनगंटीवार यांनी सदर पुनर्वसन प्रक्रिया गतीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.
पुनर्वसनाबाबत वेकोलीने सुचविलेली जागा गावकऱ्यांना मान्य नाही. यावर गावकऱ्यांसोबत बसून तोडगा काढण्यात येईल. पुनर्वसन स्थायी होण्याच्या दृष्टीने सर्वंकष अभ्यास करण्यात येईल. गाव पुनर्वसन समितीने गावाच्या पुनर्वसनाकरिता 13 मागण्या केल्या आहेत. येत्या आठ दिवसात या मागण्यांवर विस्तृत चर्चा करण्यात येईल. तसेच 13 मागण्यांचे विभाजन करून पुनर्वसन समिती समोर सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. "भटाळी गावाच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे तत्पर असून, लवकरात लवकर या प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील," असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
नक्षलवाद्यांनी युद्धविरामाचा केंद्र सरकारपुढे सादर केला प्रस्ताव ?
गडचिरोली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ अखेरपर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करणार असल्याचा निर्धार केल्यानंतर सुरक्षा दलांनी महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये आक्रमक कारवाया सुरू केल्याने नक्षलवाद्यांनी नांगी टाकली असून केंद्र सरकारपुढे युद्धविरामाचा प्रस्ताव सादर केला आहे. केंद्रीय समिती सदस्य अभय ऊर्फ सोनू भूपती याने यासंदर्भात तेलुगू भाषेत पत्रक जारी करून कारवाया रोखण्याचे सरकारला आवाहन केले आहे. आता याबाबत केंद्र सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा,ओडिशा आणि झारखंडमध्ये नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान झाले आहे. गेल्या १५ महिन्यांत झालेल्या चकमकीत तब्बल ४०० हून अधिक नक्षलवादी ठार झाले, शेकडो कारागृहात आहेत, इतकेच नव्हे तर यात अनेक निरपराध आदिवासी मारल्या गेल्याचा दावाही पत्रकात केला आहे. ३० मार्चचे हे पत्रक असून त्यावर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नक्षल नेता अभय ऊर्फ सोनू ऊर्फ भूपती याचा उल्लेख आहे
शोषणाविरोधात आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांचा सरकारकडून छळ होत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातदेखील अशाच प्रकारे अनेक कार्यकर्त्यांना कारागृहात डांबले. आदिवासींना पोलिस दलात भरती करून त्यांच्याच हातून आदिवासींची हत्या केली जात आहे, असा गंभीर आरोप पत्रकात केला आहे.
केंद्रापुढे शांती प्रस्ताव ठेवणारा भूपती हा माओवादी चळवळीतील महत्त्वाचा नेता आहे. त्याची पत्नी जहाल माओवादी महिला नेता विमला चंद्रा सिडाम ऊर्फ तारा ऊर्फ ताराक्काचा तो पती तर पश्चिम बंगालमध्ये २०११ मधील चकमकीत ठार झालेला जहाल नक्षल नेता किशनजीचा धाकटा भाऊ आहे. ताराक्काने १ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. ४ एप्रिलला केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा छत्तीसगडला संभाव्य दौरा आहे, या दौ-यापूर्वी त्याने केंद्रापुढे युद्ध विरामाचा प्रस्ताव ठेवला आहे.
आदिवासी, अल्पसंख्याकांना लक्ष्य करत आहे. दुसरीकडे जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीसाठी आदिवासी समाज संघर्ष करत आहे. येथील नैसर्गिक संसाधनांवर डोळा ठेवून हे सर्व सुरू असून सरकारने आता थांबायला हवे, असेही पत्रकात म्हटले आहे.
गडचिरोली - बोलीभाषेचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने ऑक्टोबर /नोव्हेंबर २0२४ या कालावधीत राष्ट्रीय स्तरावर प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब ऊनउणे राष्ट्रीय मराठी व कोकणी बोलीभाषा काव्यालेखन स्पर्धेत गडचिरोली येथील झाडीबोली साहित्य मंडळाचे सहसचिव तथा महाअनिस चे शहर कार्याध्यक्ष कवी उपेंद्र रोहनकर ह्यांच्या "डोरे राऊन अंद्रा" ह्या झाडीबोली कवितेला प्रथम पारितोषिक (पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह,व प्रमाणपत्र ) प्राप्त झाले.दुसरे पारितोषिक रत्नागिरीच्या डॉ. विजयालक्ष्मी देवगोजे ह्यांना बेळगावी बोलीतील " सासुरवासीन "ह्या कवितेसाठी (चार हजार रुपये रोख, सन्माचिन्ह व प्रमाणपत्र ) तर तिसरे पारितोषिक साताऱ्याच्या अनिता बर्गे यांना कोकणी रत्नागिरी बोलीतील "जिनेचे एक पुस्तक " ह्या कवितेसाठी (तीन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ) पुरस्कार मिळाले. उ्तेजनार्थ दहा बक्षीसामध्ये चंद्रपूर जिल्यातील आमडीचे कवी प्रशांत भंडारे, ह्यांना (पाचशे रुपये रोख, सन्मानचिन्ह, व प्रमाणपत्र ) "रोवना" कवितेसाठी तिसरा व बलारपूरचे कवी सुनील बावणे यांच्या लावं बेकणी कवितेला चवथा पुरस्कार (पाचशे रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ) प्राप्त झाला.१४१ कवितांचा समावेश असलेल्या "बोलीगंध" ह्या प्रातीनिधीक काव्यासंग्रह प्रकाशन सोहळ्यात सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या सभागृहात मान्यवराच्या हस्ते विजयी स्पर्धेकांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी हे होते तर संस्थेचे सचिव विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य शिवलिंग मेनकुदळे छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे बी. एन. पवार, अमोल ऊनउणे,सौ.मीनल ऊनउणे, प्रा. डी. ए. माने, उपप्राचार्य प्रा. डॉ.सुभाष वाघमारे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
समाजाला दिशा देण्याचं मोठं काम कवी करतात. समता स्वातंत्र्य, बंधूभाव हे राज्यघटनेत आहे. संविधानावर आमची भक्ती आहे. पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविणाऱ्या उपेंद्र रोहनकर यांच्या कवितेचे त्यांनी वाचन केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्पर्धा समन्वयक डॉ. प्रा. सुभाष वाघमारे यांनी विशेष प्रयत्न केलें.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विद्या नावाडकर यांनी केलें. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून आलेले सहभागी कवी, त्यांचे कुटुंबीय, विद्यार्थ्यां व प्राध्यापक यावेळी हजर होते.
देसाईगंज रेल्वेच्या बोगद्याचे काम दर्जाहिन ; ५ तारखेला सुरु होण्याची शक्यता कमी ?
आ. रामदास मसराम यांची प्रत्यक्ष पाहणी ; नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता !
देसाईगंज :-
शहरातील रेल्वे लाईनच्या बोगद्याने रहदारीची मोठी समस्या निर्माण केली होती. पावसाळ्यातच नव्हे तर हिवाळ्यातही या बोगद्यातून आवागमन करतांना नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच रहदारी करावी लागत होती नगर पालिका प्रशासनाने व लोकप्रतिनिधीनी या बाबीकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधल्याने प्रशासनाने पाणि निस्सारणाचे काम दि. २० मार्च २०२४ पासून सुरु केले. सदरचे काम 5 एप्रिल पर्यंत सुरू रहाणार असल्याची सुचना रेल्वे विभागामार्फत न.प.चे मुख्याधिकारी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केले होते. मात्र नागरिकांनी सहकार्य करून सुद्धा नागरिकांसाठी दुरुस्ती होत असलेला बोगदा दुरुस्तीच्या नावाखाली पूर्णत ओबळधोबळ होत असून दर्जाहीन असल्याचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान समजते.
देसाईगंज शहर रेल्वे लाईन मुळे दोन भागात विभागलेले असुन रहदारीसाठी तयार करण्यात आलेल्या बोगद्यामुळे पावसाळ्यात रहदारिची मोठी समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांना बोगद्यात साचलेल्या घाण पाण्यातुन आवागमन करावे लागत होते ही समस्या पावसाळ्या पुरती नव्हे तर हिवाळ्यातही उद्भवत असल्याने देसाईगंज प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही रेल्वे प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार, प्रत्यक्ष वस्तुस्थिती दर्शवून समस्येचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली, त्यानुसार रेल्वे प्रशासनाने साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठी पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु केले. बोगद्यातील पाणी निचरा होण्यासाठी पुर्वीपेक्षा भले मोठे पाईन टाकण्यात आलेले आहे. यामुळे साचलेले पाणी क्षणात बोगद्याबाहेर जाईल. परंतु बोगद्यात नव्याने पाण्याची लेवल मिळविण्याकतीला कॉंक्रीट करण्यात आले. ते कॉन्क्रेट पूर्णत ओबळ ढोबळ असून बोगदा सुरू झाल्यानंतर वाहत चालकांना मोठा त्रास सहन करीत बोगदा पार करावा लागेल. वास्तविक नव्याने कॉन्क्रेट टाकतांना एक लेवल प्लेन मध्ये यायला हवे होते परंतु तसे न करता कंत्राटदाराने त्या कामाला खराब करून टाकले. याबाबत दि. २ एप्रिलला आ. रामदास मराराम यांनी बोगद्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांनी होत असलेल्या गैरसोयीच्या मार्गाची पाहणी केली. यात मोठी अनियमीतप्ता दिसून आल्याने आ. मराराम यांनी संबंधितांनी कामात दुरुस्तीचे आदेश दिले.
यावेळी तहसिलदार प्रिती डूडूलकर न.प.चे कनिष्ठ अभियंता नंदनवार, कंत्राटदाराचे सुपरवाईजर कनिष् अभिन्यनता आरोग्य विभाग प्रमुख गेडाम, रेल्वे सल्लागार समिती सदस्य भास्कर डांगे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जिवन पा.नाट, सागर वाढई, युवक काँग्रेस अध्यक्ष अमर भरे, जावेद शेख, कमलेश बारस्कर, ज्ञानदेव पिलारे,जितू चौधरी, धर्मेंद्र लांडे, व कार्यकर्ते उपस्थित होते.
येत्या ५ तारखेपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेला बोगदा सुरू होणार की नाही यावर प्रश्ननिर्माण होत आहे
पत्नी कडून मुलासमोर अश्लील शिव्यांची लाखोळी वाहत असल्याने संतापलेल्या तलाठी पतीने संपविली जीवनयात्रा
मी मेल्यावर माझा चेहरा पत्नीला दाखवू नका
अकोला : पत्नीकडून पतीचा मानसिक व आर्थिक प्रचंड छळ आणि मुलासमोर अश्लील शिव्यांची लाखोळी वाहत असल्याने त्याला कंटाळून पाच दिवसांपासून उपाशी पतीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. मोबाइलवर स्टेटस ठेऊन आत्महत्येसाठी पत्नीला जबाबदार धरले आहे
मृत्यूनंतर माझा चेहरा सुद्धा पत्नीला दाखवू नका, असे त्यामध्ये नमूद आहे. शीलानंद तेलगोटे यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते तेल्हारा तहसील कार्यालयांत तलाठी म्हणून कार्यरत होते.
तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी " व्हॉटसॲप " वर एक स्टेटस ठेवले. त्यामधून तेलगोटे यांच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले. शिलानंद तेलगोटे यांनी मृत्यू पूर्वीच्या या स्टेटस मध्ये पत्नी आपला मानसिक छळ करते. मृत्यूनंतर चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये, असेही नमूद केले. पोलिसांनी तेलगोटे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
तेलगोटे यांनी " व्हॉटसॲप स्टेटस " मध्ये पत्नीने आपला छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपले मृत्यूपत्रही तयार केले होते. यामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केल्याची माहिती आहे. या घटनेवरून परिसरत हळहळ व्यक्त केली जात आहे.
शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा. मी दिनांक 30/03/2025 रोजी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलासमोर अश्लील शिव्या देते.
आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते. माझे पैसे तिचा भाऊ प्रवीण गायबोलेकडे असून, त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती. सदर रक्कम मी तलाठीकडून काढली असून त्याचं व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे. कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे.
माझ्या मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की, माझं पोस्टमार्टम होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये. कारण आज मी पाच दिवस झाले, जेवण केलेलं नाही. माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल असे नमूद केले आहे
तिहेरी विचीत्र अपघातात सात ठार तर २५ गंभीर जखमी
अकोला:-
आज दि .२ एप्रिल सकाळी खामगाव ते शेगाव रोड वर एस टी बस, बोलेरो आणि लक्झरी बस चा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून 25 जखमी झाले आहेत. जखमींना अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघात पुणे परतवाडा बस ला बोलेरो ने मागून धडक दिली नंतर मागून येणाऱ्या लक्झरी बस ने दोन्ही वाहनांना धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव ते शेगाव रोडवर जयपुर लांडे फाटा समोर हा विचित्र अपघात झाला आहे. पुणे येथून परतवाडा येथे जाणाऱ्या एसटी बसला मागून आधी एका चारचाकी वाहनाने धडक दिली, त्यानतंर एका खाजगी ट्रॅव्हल्सने या दोन्ही वाहनांना उडवले. या तिहेरी अपघातात गाड्यांचेही बरेच नुकसान झाले. आज पहाटे पाच वाजता झालेल्या या तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 लोकं जखमी झालेत. त्यापैकी 6 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी तिहेरी अपघातामुळे मोठी खळबळ माजली असून अनेकांच्या जीव गेल्याने हळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच तत्काळ खामगाव शहर पोलिस चौरस स्टेशन चे ठाणेदार राजेश पवार हे आपल्या कर्मचाऱ्यासमवेत पोहचले तसेच स्थानिक तहसीलदार सुनील पाटील ही पोहचले. वाहनांमध्ये अडकलेल्या रुग्णांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मधील गंभीर रुग्णांना अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. सात लोक मृत्युमुखी पडले आहेत
अपघातात जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतो म्हणून अपघात करणाऱ्या चालकाने फेकले पुलावरून
नागपूर:-
जिल्ह्यातून मानवतेला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. येथे रस्ते अपघातातील जखमीला आरोपीने लोकांच्या गर्दीमुळे रुग्णालयात नेण्याचे नाटक केले. मग तो थोडा पुढे गेला आणि त्यांना एका पुलाखालून फेकून देऊन पळून गेला. यानंतर जखमी व्यक्ती बराच वेळ वेदना सहन करत राहिला आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. हे प्रकरण नागपूर जिल्ह्यातील मिहान सेझला लागून असलेल्या कर्करोग संस्थेशी संबंधित आहे. मृत व्यक्तीचे नाव कृष्णा बोरसे असे आहे. कृष्णा बोरसे हे त्यांच्या दुचाकीवरून कामावरून घरी परतत होते. तेवढ्यात एका भरधाव गाडीने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर जखमींभोवती लोकांची गर्दी जमली. हे पाहून आरोपी चालक जखमी व्यक्तीला सोबत नागपूरच्या दिशेने रुग्णालयात घेऊन गेला. यानंतर, त्याने जखमी व्यक्तीला पुलाखाली फेकून दिले आणि पळून गेला.
पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी नागपूरच्या सरकारी रुग्णालयात कृष्णा नावाच्या व्यक्तीला दाखल केले आहे का हे शोधून काढले. पोलिस तपासानंतर असे आढळून आले की कृष्णा नावाच्या कोणत्याही जखमी व्यक्तीला नागपूरमधील कोणत्याही सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते. यानंतर पोलिसांना संशय आला की जखमी व्यक्तीला कोणत्याही रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की एक जखमी व्यक्ती चिच भवन पुलाखाली पडून आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात आपल्या जाहीरनाम्यात मोठी आश्वासने दिल्या गेली आणि भोळ्या भाबड्या जनतेने याच जाहीरनाम्यावर म्हणजे पोकळ आश्वासनावर विश्वास ठेवून राज्यात भारतीय जनता पक्षाचा सरकार प्रस्थापित केला गेला परंतु हे सरकार खोटारडा आहे हे आता जनतेच्या लक्षात यायला लागले आहे.
भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते आणि सत्तेत येतात सरड्यासारखे रंग बदलून यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्या गेली.म्हणजे शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ न केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसोबत विश्वासघात केला अनेक शेतकरी पिक कर्ज माफ होईल ही अशा उराशी बाळगून जीवन जगत असताना त्याच्या पदरी निराशाच पडली.
आज राज्यातील कित्येक शेतकरी पिक कर्ज भरू शकले नाही त्याला अनेक अडचणींना सामना करावा लागला ज्याने पीक कर्ज भरला त्याला मोठी तारेवरची कसरत करून उसनवारे पैसे घेऊन पीक कर्ज भराव लागलं ही एक शोकांतिकाच म्हणावे लागेल.जे शेतकरी पीक कर्ज भरू शकले नाहीत त्याच्या कपाळी थकबाकी कर्जदार शेतकरी म्हणून नोंद झाली.
राज्यातील सरकार धन दांड्याचे सरकार आहे हे सरकार शेतकरी विरोधक आहे असं म्हणाला काहीही हरकत नाही निवडणुका येतात जातात तो काही विषय नाही शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसून तुम्ही दिमागदार बाणा दाखवत असाल तरी पण राज्यातील जनता तुमचे कारनामे उघड्या डोळ्यांनी बघत आहे आणि तो तुमचा माज उतरवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे मात्र खंत आहे.
बल्लारपूर येथील तहसीलदार अडकला लाप्रवीच्या जाळ्यात, शेतकऱ्याकडून २ लाख २० हजारांची लाच मागणे पडले महागात
तलाठी धूम ठोकत पसार झाला
बल्लारपूर:-
राज्यात गेल्या काही दिवसांत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका लावला असून अनेक छोटे-मोठे अधिकारी जाळ्यात अडकले आहेत
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लापूरचे तहसीलदार लाच घेताना जाळ्यात अडकले आहेत लाच लुचपत प्रतीबंधक विभागाने तहसलीदार अभय अर्जून गायकवाड यांना अटक केली असून यातील दुसरा आरोपी असलेला तलाठी सचीन रघुनाथ पुळके हा फरार आहे.
सध्या, ए.सी.बी.(A.C.B.)कडून आरोपी तलाठी पुळके याचा शोघ घेण्यात येत आहे.
बल्लारपूरचे तहसीलदार आणि त्यांचा सहकारी तलाठी असे दोघेही लाच प्रकरणात अडकले आहेत. फिर्यादीने स्वतःच्या शेतातील माती आणि मुरूमाचे उत्खनन केले होते.
मात्र, हे उत्खनन अनधिकृत असल्याचे सांगत संबंधित महसूल कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. अनधिकृत गौण खनिज उत्खननाचे हे प्रकरण असून मिटविण्यासाठी लाच मागितली होती.
संबंधित महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याकडे २ लाख २० हजार रुपयांच्या रक्कमेची मागणी केली होती.
लाच म्हणून ठरलेल्या या रकमेतील १ लाख २० हजार रुपये शेतकऱ्याने त्यांना देऊ केले होते. तर, उर्वरीत १ लाख रुपये शिल्लक असल्याने लाचखोरांनी सततचा तगादा लावला होता.
त्यामुळे, वैतागलेल्या शेतकऱ्याने या लाचखोरीची ए.सी.बी.(A.C.B.)कडे तक्रार केली. पडताळणी केली असता लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती
त्यानंतर, ए.सी.बी.(A.C.B.)च्या पथकाने सापळा रचून महसूल अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली. दरम्यान, ए.सी.बी.(A.C.B.)च्या कारवाईत तहसीलदार
अभय गायकवाड आणि कवडजई सांजाचे तलाठी
सचिन पुकळे त्यांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. ए.सी.बी.(A.C.B.)ने तहसीलदाराला ताब्यात घेतले असून तलाठी पुकळे धुम ठोकून फरार आहे. याप्रकरणी, ए.सी.बी.(A.C.B.)कडून पुढील कारवाई सुरू आहे.
संशयाच्या भुताने पछाडलेल्या पतीने गळा आवळून संपविले पत्नीला
रावेर :-
संशयाच्या भुताने पछाडलेल्या पतीने गळा आवळून पत्नीची जीवनयात्रा संपवल्याची घटना रावेर तालुक्यातील अभोडा बुद्रुक येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे. आशाबाई संतोष तायडे वय 38 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
रावेर तालुक्यातील अभोडा बुद्रुक येथील संतोष शामराव तायडे हा पत्नी आशाबाई सोबत राहत होता. आशाबाई रात्री एका व्यक्तीसोबत बोलत होती. याबाबत संतोष तायडे याने पत्नी आशाबाईला कोणासोबत बोलत होती असे विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतोषला याचा राग आला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना आज सकाळी अभोडा बुद्रुक येथे घडली.
घटना घडल्यावर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना दिली. तात्काळ घटनास्थळी डी वाय एस पी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, उप निरीक्षक तुषार पाटील हजर झाले. मृतदेहाचे शव विच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.
आरोपी पती संतोष शामराव तायडे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे
एका तरुणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या इसमास , पत्नीनेच दिले पोलीसांच्या ताब्यात
नागपूर : ओळख लपवून महिलांसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून त्याचे आक्षेपार्ह फोटो, व्हीडिओ काढण्याचा आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात नागपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या आरोपीची पत्नीच पीडित मुलीसाठी धावून आली. तिनेच हे प्रकरण समोर आणलं आहे.
नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अब्दुल शरीफ कुरेशी (वय 33) असं आरोपीचं नाव आहे. तो टेका-नाका परिसरात पानटपरी चालवतो. त्याचं चार वर्षांपूर्वीच लग्न झालं आहे. त्याला तीन वर्षांची मुलगी सुद्धा आहे. असं असलं तरी, आरोपी स्वतःची ओळख, वय आणि लग्नाबद्दलची माहिती लपवून इतर महिला आणि मुलींसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत होता. त्या महिलांना लग्नाचं खोट आश्वासन द्यायचा.
या आरोपीनं चार ते पाच महिलांची अशी फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. पण, सध्या 19 वर्षांची एक पीडित मुलगी समोर आली आहे. तिनं पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अब्दुलला 29 मार्चला अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 64, 69 या कलमानुसार बलात्कार आणि खोटं आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 19 वर्षीय मुलगी ही भंडारा जिल्ह्यातली रहिवासी आहे. तिची सप्टेंबर 2024 मध्ये आरोपी अब्दुलसोबत ओळख झाली. एका महाप्रसादाच्या कार्यक्रमात अब्दुल तिला भेटला. पण, यावेळी त्यानं स्वतःचं नाव बदलून सांगितलं. तसेच वय सुद्धा केवळ 24 वर्षे सांगितलं. त्यानंतर दोघांचं बोलणं सुरू झालं. दोघांमधील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तसेच त्यानं तिला लग्नाचं आश्वासन सुद्धा दिलं होतं. पण, हा आपल्यासोबत खोटं बोलतोय असं तिला चार महिन्यानंतर समजलं.या व्यक्तीनं वय, नाव सगळं खोट सांगून आपली फसवणूक केली असल्याचं तिच्या लक्षात आलं.
मुलगी नागपुरात शिकायला राहत असल्यानं आणि कोणाचा पाठिंबा नसल्यानं शांत होती. पण, या प्रकरणात आरोपीच्या पत्नीनेच या पीडित मुलीची मदत केली. तसेच तिला पोलीस ठाण्यापर्यंत आणण्याचं काम केलं. आरोपीच्या पत्नीमुळेच हे प्रकरण समोर आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल हा पॉर्न व्हीडिओ बघून स्वतःच्या पत्नीकडेही तशीच मागणी करायचा. तिनं मागणी पूर्ण केली नाही, तर तिला मारहाण करून तिचा शारीरिक छळ करायचा. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडणं होत होती. पतीच्या या त्रासाला कंटाळून ती 6 महिन्यांपासून माहेरी राहत आहे. तिनं पोलिसांत शारीरिक छळाबद्दल तक्रार दाखल केली होती.
तो या महिलांसोबत फक्त ओळख लपवून बोलतच नाही, तर त्यांच्यासोबत संबंध ठेवून त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. तसेच त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचंही तिला व्हॉट्सअपर दिसलं. त्यानंतर तिनं सगळे पुरावे गोळा करून पीडित महिलांना फोन केले. पण, महिला भीतीपोटी तक्रार द्यायला तयार नव्हत्या. यापैकी फक्त एक 19 वर्षीय पीडित मुलगी समोर आली. असले प्रकार करणाऱ्या पतीला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असं तिनं ठरवलं. यानंतर पतीच्या व्हॉट्सअप चॅट आणि फोटोंवरून तो इतर महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं तिला दिसलं.
तिनं आरोपीच्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात जात ओळख लपवून आणि लग्नाचं खोट आश्वासन देऊन वारंवार बलात्कार झाल्याची तक्रार पाचपावली पोलीस ठाण्यात दाखल केली. आरोपीनं तिला फोटो व्हायरल करण्याचीही धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि खोटं आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला अटकही केली. आरोपीनं आणखी 4-5 महिलांचं लैंगिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा संशय पोलिसांना आहे. आता पोलीस त्यादृष्टीनं तपास सुरु आहे
शिक्षीका राहायची घरी, विद्यार्थ्यांना शिकवी मजुरीकरी
शिक्षीकेला केले तात्काळ निलंबित
भोर : आज नौकरी मिळविण्यासाठी बेरोजगार तरुणांना धडपड करावी लागते मात्र नौकरी मिळाली म्हणून गौरहजर राहून स्वतःऐवजी दुसऱ्या महिलेस वर्गात अध्यापन करायला लावून विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्या महिला शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. पुण्यातील भोर नगरपालिकेच्या महाराणा प्रताप शाळा क्रमांक एकमध्ये हा प्रकार घडला आहे.
भारती दीपक मोरे असं सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या उपशिक्षिकेचं नाव आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्याधिकारी गजानन शिंदे आणि प्रशासन अधिकारी राजकुमार बामणे यांनी अचानक शाळेला भेट दिली. त्यावेळी शिक्षिका भारती मोरे या अनुपस्थित असल्याचे आढळले. मात्र, रजिस्टरवर मोरे यांची सही होती. विशेष म्हणजे त्यांच्या जागी दुसऱ्या महिला होत्या. ती महिला मोरे शिक्षिकेच्या जागेवर विद्यार्थ्यांना शिकवत होत्या.
या दरम्यान या गोष्टीचा तपास करण्यात आल्या. भारती या त्या महिलेला ठराविक रक्कम देऊन अध्यापनासाठी ठेवले असल्याची खात्री झाली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आणल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी भारती मोरे यांना खुलासा देण्याचे आदेश दिले. मात्र, त्यांचा खुलासा असमाधानकारक असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
भारती मोरे यांच्यावर विनापरवानगी गैरहजर राहणे, विनापरवानगी मुख्यालय सोडणे, कर्तव्यात निष्काळजीपणा करणे, गैरहजर कालावधीत खासगी व्यक्तीला वर्गाचा ताबा देणे, वर्ग उघडे ठेवून चाव्या त्रयस्त व्यक्तीकडे देणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस अडथळा निर्माण करणे, या कारणांमुळे निलंबन करण्यात आले. नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांची त्रिस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.समितीचा अहवाल येईपर्यंत मोरे यांचे निलंबन राहणार आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.